नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर आधी नागरीकांची कोरोना चाचणी केली जात असून नंतरच लसीकरण केले जात आहे.
आधी कोरोना चाचणी, नंतरच लसीकरण -
नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्ण वाढीत नाशिक देशात अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून रोज हजारोच्या पटीने मिळून येत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सर्व बेड फुल झाली आहेत. अशात आता प्रशासनाने कोरोना लसीकरणावर भर दिला असून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात लसीकरण सुरू असून लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आधी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जर व्यक्ती निगेटीव्ह असेल तरच त्याचे लसीकरण करण्यात येत आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये अल्प प्रतिसाद -