महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणा आणि बँकचा हलगर्जीपणा समोर येत आहे. नाशिक-पुणे-महामार्गवर असलेल्या उपनगर भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

By

Published : Oct 23, 2019, 5:38 PM IST

नाशिक - अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपनगर भागामध्ये असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम वाचवण्यात यश आले आहे.

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणा आणि बँकचा हलगर्जीपणा समोर येत आहे. नाशिक-पुणे-महामार्गवर असलेल्या उपनगर भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरांचा हा प्रयत्न फसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम वाचली आहे. यापूर्वी देखील २ वेळा अॅक्सीस बँकेच्या बाजूला असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता, तर काही दिवसांपूर्वी सातपूर भागांमध्ये एटीएमवर दरोडा टाकून पाळणाऱ्या चोरट्यांना नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली होती. वारंवार चोरट्यांकडून एटीएम मशीनला लक्ष्य केले जात असल्याने एटीएम मशीनला असलेल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वी सर्व बँका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एटीएम मशीन सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा शहरातील अनेक एटीएम मशीन बाहेर सुरक्षारक्षक नसणे, सीसीटीव्ही तसेच अर्लाम सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच बँकांनी सुद्धा एटीएम मशीनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details