महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : जेसीबीने पाईपलाईन तोडल्याने उडाल्या पाण्याच्या उंच कारंज्या; लाखो लिटर पाणी वाया - nashik road water supply line breaks

जेसीबी चालक बांधकामाचे काम करण्यासाठी सदर परिसरात आला होता. जेसीबीच्या चालकाने मुद्दामहून मुख्य जलवाहिनीला धडक दिल्याने तिचा व्हॉल्व्ह तुटला. त्यानंतर जेसीबी चालकाने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

nashik
जलवाहिनी तुटल्याचे दृश्य

By

Published : Dec 22, 2019, 5:21 PM IST

नाशिक- नाशिकरोड आणि गांधीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तोडल्याने ५० फुटाहून उंच पाण्याचा फवारा उडाला व लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना काल गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ घडली. एका अज्ञात जेसीबी चालकाने या जलवाहिनी फोडल्यामुळे ही घटना घडल्याचे समजले आहे.

जलवाहिनी तुटल्याचे दृश्य

जेसीबी चालक बाधकामाचे काम करण्यासाठी सदर परिसरात आला होता. दरम्यान, जेसीबी चालकाने मुद्दामहून मुख्य जलवाहिनीला धडक दिल्याने तिचा व्हॉल्व्ह तुटला. त्यानंतर जेसीबी चालकाने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे शहरातील पंचवटीसह काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. महापालिकेला या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य पाण्याचा विसर्ग थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सदर घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मुख्य जलवाहिनी असल्याकारणाने आकाशात उंच पाण्याचा फवारा उडू लागल्याचे पाहून नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

हेही वाचा-सायकल यात्रेतून सामाजिक संदेश; येवल्यातील जय तुळजा भवानी मित्र मंडळाचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details