महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंपावर धुडगूस घालणाऱ्यांना अनोखी शिक्षा; सात दिवस देणार "हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा"चा संदेश - nashik police

दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याच्या वादातून चाैघांनी पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. या संशयितांना अटक केल्यावर आता म्हसरूळ पोलिसांनी संशयितांना सात दिवस अनोखी शिक्षा केली आहे. यात त्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांचे "हेल्मेट वापरा सुरक्षित रहा" पेट्रोल पंपचालकांना सहकार्य करा, असे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ह्या अनोख्या शिक्षेची सर्वच शहरात चर्चा आहे.

सात दिवस देणार "हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा"चा संदेश
सात दिवस देणार "हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा"चा संदेश

By

Published : Aug 31, 2021, 7:39 AM IST

नाशिक - दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याच्या वादातून चाैघांनी पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. या संशयितांना अटक केल्यावर आता म्हसरूळ पोलिसांनी संशयितांना सात दिवस अनोखी शिक्षा केली आहे. यात त्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांचे "हेल्मेट वापरा सुरक्षित रहा" पेट्रोल पंपचालकांना सहकार्य करा, असे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ह्या अनोख्या शिक्षेची सर्वच शहरात चर्चा आहे.

पेट्रोल पंपावर धुडगूस घालणाऱ्यांना अनोखी शिक्षा

नाशिक शहरात पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी १५ ऑगस्ट पासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' अशी मोहीम सुरू केली आहे. मात्र दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर बुधवारी (ता.१८) रोजी सायंकाळी चौघा संशयितांनी येथील कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) यांच्याकडे पेट्रोल मागितले. तेव्हा गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार हेल्मेट नसल्याच्या कारणावरुन त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. त्यावरून पंप कर्मचारी व संशयितांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना अवघ्या काही तासांत जेरबंद देखील करण्यात आले. पोलीस आयुक्त पांडेय यांनीही या घटनेची दखल घेत दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता.१९) सदर पेट्रोल पंपावर भेट दिली व पंप कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता.

आमच्याकडून चूक झाली तुम्ही चूक करू नका -

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांनी चूक केली आहे. त्यांना आम्ही सांगितले की लोकांमध्ये हेल्मेटविषयी जनजागृती करा. ते स्वतःहून हेल्मेट जनजागृतीसाठी तयार झाले आहेत. ते आता स्वतःहून लोकांना सांगत आहे की, आमच्याकडून चूक झाली तुम्ही चूक करू नका. घटनेच्या बारा दिवसानंतर म्हसरूळ पोलिसांनी या संशयिताना सात दिवसांची अनोखी शिक्षा केली आहे. या संशयितांनी हातात फलक घेऊन पेट्रोल पंपावर हेल्मेटशिवाय येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करावयाचे आहे. त्यानुसार सोमवार (ता.३०) रोजी या अनोख्या शिक्षेस प्रारंभ झाला असून, संशयित मंगेश पगारे, मयूर देवकर आणि अक्षय जाधव हे फलक घेऊन पेट्रोल भरण्यासाठी रिलायन्स पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करीत आहेत.

गुन्हेगारांकडूनच वाहनचालकांचे प्रबोधन अनोख्या शिक्षेचे स्वागत -

नाशिक शहरात हेल्मेट न घालताच पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून फॉर्म भरून घेत ७५ वाहनधारकांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे .पोलिसांनी एरवी गुन्हेगारांना गुन्हा घडल्या नतर उठाबशा काढायला लावणे, कठोर शिक्षा करणे, भरचौकात त्यांची धिंड काढणाऱ्या पोलीस प्रशासनाने यावेळी मात्र अनोखी शक्कल लढवली आहे. धिंड काढण्यापेक्षा गुन्हेगारांकडूनच वाहनचालकांचे प्रबोधन करवून घेण्याच्या शिक्षेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. म्हसरूळ पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाची शहरातही चांगलीच चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details