नाशिक- तुम्ही अनेक प्रकारची आंदोलने पाहिली असतील. तसेच आंदोलनाची विविध कारणेही तुम्ही पाहिली असतील. मात्र, नाशिकमध्ये राज्यातील तमाम पुरुषांनी एक आगळे-वेगळे आणि धक्कादायक आंदोलन केले आहे. राज्यातील पत्नीपीडित पुरुषांनी रामकुंडावर चक्क मुंडन आणि पिंडदान करत आंदोलन केले. 'वास्तव' फाउंडेशनच्या माध्यमातून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -ठरलं.. 'मनसे' ही विधानसभेच्या रिंगणात, नाशिकमधील सर्व जागा लढवणार
या आंदोलनामध्ये वयस्कर तर काही चाळिशीतले लोक आले होते. या मंडळीनी यावेळी आपल्याच पत्नीचा निषेध केला. पत्नीपीडित आणि महिला संरक्षण कायदा पीडित मंडळींनी आपल्याच पत्नीच्या नात्याचे पिंडदान केले. पत्नीपासून होणाऱ्या सर्व त्रासाची आहुती देऊन मुंडन केले. तसेच आमच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी केंद्रीय पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी, अशी मागणी या संघटनेने केली.