महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chain snatching in Nashik : चोरांचे नाशिक पोलिसांना आव्हान, चक्क केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली! - Union Minister Bharti Pawar

नाशिक शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांनी उच्छांद मांडला आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलंय. आता चोरट्यांनी थेट केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्रींच्याच गळ्यातील पोत पळवल्याची घटना दुर्गा नगरमध्ये घडलीय.

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आई शांताबाई बागुल
केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आई शांताबाई बागुल

By

Published : Aug 20, 2023, 12:28 PM IST

Updated : Aug 20, 2023, 12:41 PM IST

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आई शांताबाई बागुल

नाशिक: शहारामधील गुन्हेगारी वाढू लागलीय. दररोज वेगवेगळ्या भागात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. आता चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांनी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळ्याची सोन्याची पोत पळवलीय. आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगरमध्ये ही घटना घडलीय. या परिसरामध्ये वर्दळ कमी असते. याचा फायदा घेत चोरट्य़ांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील पोत पळवली.परिसरात कोणीच नसल्यानं त्यांना कोणाला आवाज देखील देता आला नाही. थेट केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्रीच्या गळ्यातील पोत पळवल्यानं शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

पोतची चोरी : शांताबाई बागुल असं भारती पवारांच्या आईचं नाव आहे. त्या सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरातील भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची पोत हिसकावून नेली. चोरांनी हल्ला केल्यामुळं शांताबाई बागुल ह्या घाबरून गेल्या. या परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्या कारणामुळे त्यांना कोणाला आवाज देखील देऊ शकल्या नसल्याचं त्यां म्हणाल्या. ही घटना घडल्यानंतर त्या प्रचंड घाबरल्या होत्या. शांताबाई बागुल ह्यांनी नाशिक शहरातील म्हसरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

सायंकाळी भाजी मार्केटमध्ये जात असताना चोरट्यांनी गळ्यातील पोत ओरबाडून नेली. आजुबाजुला कोणीच नसल्याने मदतीला कोणीच नव्हते. -शांताबाई बागुल, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आई.

चोऱ्या वाढल्या : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात चोरी, खून, दरोड्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत. आहेत. त्यात चैन स्नॅचिंग ही नित्याचीच घटना झालीय. दररोज कुठे ना कुठे साखळी चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात नाशिक पोलीस आयुक्तांचा अंकुशच राहिला नसल्याचे प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जातेय. शहरात ठिक-ठिकाणी अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. पोलिसांनी या भागातील गस्त वाढवावी. चोरट्यांच्या मनात पोलिसाची भीती घालावी,अशा भावना सामान्य नागरिकांडून व्यक्त केल्या जात आहेत.

टोळक्याच्या हल्ल्यात 2 तरुणांचा मृत्यू :चुंचाळे शिवारातही गुंडांची दहशत वाढलीय. काही दिवसांपूर्वी येथे टोळक्याने दोन तरुणांची हत्या केल्याची घटना घडलीय. लहान मुलाला होणाऱ्या मारहाणीपासून वाचवण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांवर टोळक्याने सशस्त्र हल्ला केला होता.

हेही वाचा-

  1. Crime News : प्रेयसीच्या प्रेमात कर्जबाजारी झाला अन्...
  2. Old Man Murder Case Mumbai: वृद्धाची हत्या करून २ कोटींचा ऐवज लुटला; पोलिसांनी 'ही' युक्ती वापरून लावला शोध
Last Updated : Aug 20, 2023, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details