नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुनील ट्रान्सपोर्टसमोर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकीवर येणाऱ्या युवकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या दुचाकीस्वाराने, विरुद्ध दिशेने का आला, असे विचारले असता तो युवक व त्याच्या साथीदारांनी दुचाकी जाळून वाहनचालकासह मदतीला आलेल्या तीन व्यक्तींना बेदाम मारहाण केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत टवाळ युवकांनी जाळली कामगाराची दुचाकी - नाशिक सातपूर औद्योगिक वसाहत प्रकरण
विरुद्ध दिशेने का आला, असे विचारले असता, समाजकंटकांनी दुचाकी जाळून वाहनचालकासह मदतीला आलेल्या तीन व्यक्तींना बेदाम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
संकेत कासार (26) रा. वासळी असे जाळण्यात दुचाकी चालकाचे नाव आहे. संकेत हे टीव्हीएस स्टारवरून (एमएच 15 बीव्हाय 1231) कामावरून घरी परतत होता. समोरून विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या मुलांनी त्यांना धडक दिली. यावरून संकेत यांनी त्याला विरुद्ध दिशेने का आला, असे विचारले असता त्या युवकांनी वाद घालून संकेतला मारहाण केली. तसेच त्याची दुचाकीदेखील पेटवून दिली. त्यावेळी अज्ञात टवाळखोर मुलाने त्याच्या अन्य 6 साथीदारांना बोलावून घेतले. हा प्रकार भररस्त्यात घडत असल्याने एका स्कार्पिओ वाहनातून नागरे कुटुंबातील 3 व्यक्तींनी वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती केली; परंतु या टवाळखोरांनी वाहनचालकासह मदतीस आलेल्यांना देखील बेदम मारहाण केली. यामध्ये सर्वजण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपींचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत.