नाशिक- दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार या प्रचंड मताने विजयी झाल्या आहेत. यानंतर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मालेगाव बाह्यमध्ये जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार यांनी मनमाड-नांदगाव मालेगाव या शहरी व ग्रामीण भागात डॉ. भारती पवार यांच्या विजयाचे होल्डिंग लावले आहेत. या होल्डिंगमधून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवलेंसह महादेव जानकर यांचे फोटो वगळण्यात आले आहेत.
भारती पवारांच्या विजयी होल्डिंगवरून उद्धव ठाकरे, रामदास आठवलेंचे फोटो गायब
विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मालेगाव बाह्यमध्ये जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार यांनी मनमाड-नांदगाव मालेगाव या शहरी व ग्रामीण भागात डॉ. भारती पवार यांच्या विजयाचे होल्डिंग लावले आहेत. या होल्डिंगमधून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवलेंसह महादेव जानकर यांचे फोटो वगळण्यात आले आहेत.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असून महायुतीचा धर्म महायुतीने व त्यातील प्रत्येक पक्षांनी पाळला पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करत आहेत. या गोष्टीची दखल नाही घेतली तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचे परिणाम होऊ शकतात यात शंका नाही.
नांदगाव परिसरात मनिषा पवार यांचे कुठलीही सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कुठलेही काम केले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच सर्वात जास्त मताधिक्य हे नांदगाव शहरातून मिळाले असून यामध्ये शिवसेना, रासप, भाजप अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र प्रचार करून भारती पवार यांना यश मिळून दिले आहे.