नाशिक -शहरातील गुंडांकडून डी जे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेऊन बेदम मारहाण करत दोघांना अनैसर्गिक आत्याचार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
धक्कादायक : डीजे चालक तरुणांना रात्रभर डांबून बेदम मारहाण, नाशिकमधील प्रकार - Nashik Crime News
शहरातील गुंडांकडून डीजे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
नाशिक येथील एका सराईत गुंडाचा वाढदिवस असल्याने दरी मातोरी शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंचवटी भागातील डी जे साउंड सिस्टीम बोलावण्यात आली होती. पार्टीत रात्री दहा वाजल्यानंतर दोन डी जे चालक युवकांनी डी जे वाजवण्यास मनाई केली. याचाच राग येऊन गुंड भाई याच्यासह त्याच्या १२ ते १५ मित्रांनी या दोघांना दारू पाजून एका खोलीत डांबून ठेवले, त्यांचे कपडे काढून जबर मारहाण केली. तसेच या दोघांना बंदुकीचा धाक दाखवून अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. काहींनी त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकून शॉक देऊन सिगरेटचे चटके दिले. या दोघांनी कशीबशी सुटका करून जीव वाचवत घर गाठले. या दोन्ही युवकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील मुख्य संशयितांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून हा शहरात भाजपच्या महिला आमदाराचा भाचा असल्याचे सांगत भाईगीरी करत असल्याचे नागरीक सांगतात. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयितांसह त्यांच्या साथीदारांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.