नाशिक - नाशिकमधील सुरगाणा येथे ताबा सुटल्याने गाडी झाडावर धडकल्याने अपघात झाला ( Nashik Two Wheeler Accident ) आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर ( Nashik Two Wheeler Accident two Dead ) जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंकज जयराम पवार ( वय 23, रा. बोरपाडा कोटंबी ह.मु. सुरगाणा ) भोला हिरामण बागुल ( वय 22, रा. साबरदरा ह.मु. सुरगाणा ), अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर राहुल गोपाळ चौधरी ( वय 23, रा. उबरपाडा ) याच्यावर उपचार सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी, भोला बागुल आणि पंकज पवार हे वणीकडून सुरगाणाकडे सुझुकी आर यादुचाकीने जात होते. घागबारी फाट्याच्या वळणावर आल्यानंतर दुचाकीवरचा ताबा सुटल्याने एका झाडावर दुचाकी आदळून पंचवीस ते तीस फुट खोल खड्ड्यात पडली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, पंकज पवार, भोला बागुल दोघांचा मृत्यू झाला. तर राहुल चौधरी हा गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.