नाशिक - रंगपंचमी उत्साहात साजरी होत असताना इगतपुरी घोटी येथील दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रंगपंचमी खेळून झाल्यावर इगतपुरी रेल्वे तलावावर आंघोळ करण्यासाठी आलेल्या घोटी येथील या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सदरच्या घटनेमुळे घोटी शहरात शोककळा पसरली आहे.
इगतपुरी रेल्वे तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू - egatpura
घोटीच्या नवनाथनगर येथील मयुर भोले (वय २१), तोसिफ मनियार (वय २३) आणि जलिम अन्सारी (वय २३) हे तीन मित्र आंघोळ करण्यासाठी सायंकाळी इगतपुरी शहरातील रेल्वे तलावावर आले होते.
घोटीच्या नवनाथनगर येथील मयुर भोले (वय २१), तोसिफ मनियार (वय २३) आणि जलिम अन्सारी (वय २३) हे तीन मित्र आंघोळ करण्यासाठी सायंकाळी इगतपुरी शहरातील रेल्वे तलावावर आले होते. यात मयूर भोले आणि तौसिफ महमूद मणियार हे दोघे तळ्यात अंघोळ करत असताना तलावातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले, तर जमील अन्सारी हा थोडक्यात वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नांदगाव येथील पाणबुड्यांच्या मदतीने बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू केले.
रात्री १० वाजेच्या सुमारास मयुर भोले याचा मृतदेह बचाव पथकाला तळ्यातून बाहेर काढण्यात यश आले, तर तोसिफ मनियार मृतदेह रात्री बारा वाजेच्या दरम्यान काढण्यात आला. या बातमीची माहिती मिळताच घोटी इगतपुरी नागरिकांनी तलावाभोवती मोठी गर्दी केली होती. दोन्ही मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते या घटनेबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत