नाशिक- गोदावरीत नदीपात्रात अघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे रविवारी सायंकाळी घडली. शामराव बाळु सुरवाडे आणि हर्षद निलेश गुंजाळ असे त्या बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान यातील हर्षदचा मृतदेह आज सकाळी गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. तर शामरावचा शोध सुरू आहे.
शामराव बाळु सुरवाडे (वय 23) हा आपल्या बहिणीच्या विवाहासाठी आलेल्या मामेभाऊ हर्षद निलेश गुंजाळ ( वय 18 ) याच्यासोबत रविवारी दुपारी पिंपळस गावाजवळील गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. यावेळी दोघेही गोदावरी नदीपात्रात आंघोळ करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.