महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाविकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, दोन महिला ताब्यात

नवरात्रीमुळे कालिका माता मंदिरात आज (मंगळवार) सकाळपासून भाविकांनी मोठ्ठी गर्दी केली होती. तेव्हा सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान, एका महिलेचा मोबाईल चोरांनी लंपास केला. ही घटना ताजी असतानाच, काही वेळातच एका महिलेचा मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न महिला चोरांनी केला. तेव्हा भाविकांनी त्या चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

भाविकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, दोन महिला ताब्यात

By

Published : Oct 1, 2019, 8:45 PM IST

नाशिक- जिल्ह्यात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ग्रामदेवत कालिका माता मंदिरात भाविकांची मोठ्ठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरट्यांनी मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, भाविकांच्या सतर्कतेमुळे त्या महिला चोरांना पकडण्यात आले.

नवरात्रीमुळे कालिका माता मंदिरात आज (मंगळवार) सकाळपासून भाविकांनी मोठ्ठी गर्दी केली होती. तेव्हा सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान, एका महिलेचा मोबाईल चोरांनी लंपास केला. ही घटना ताजी असतानाच, काही वेळातच एका महिलेचा मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न महिला चोरांनी केला. तेव्हा भाविकांनी त्या चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कालिका माता मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला...

दरम्यान, नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. ही संधी ओळखून चोर चोरी करण्याचा प्रयत्न करतात. पकडण्यात आलेल्या महिला चोरांकडून मंगळसूत्रासोबतच काही मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याबाबत अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

हेही वाचा -भारतीय जवान सागर चौधरी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हेही वाचा -सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार

ABOUT THE AUTHOR

...view details