दिंडोरी (नाशिक) -नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिके अपघात झाला. या दोन दुचाकीत झालेल्या धडकेत 2 ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवार (काल) रात्रीच्या सुमारास घडली आहे.
नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार
करंजाळीकडे येणारी डिस्कवर क्रमांक MH-15- CX -314 व करंजाळीकडून नाशिककडे जाणारी शाइन क्रमांक MH-15-CZ-9553 यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर नर्सरीजवळ धडक झाली. या धडकेत बाळू रामदास थाळकर (वय-32 रा. हेदपाडा), युवराज मोतीराम बोंबले (वय-22 रा.लिंगवणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिल हरिदास म्हसरे हा जखमी झाला आहे.
पेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार नाशिककडून करंजाळीकडे येणारी डिस्कवर क्रमांक MH-15- CX -314 व करंजाळीकडून नाशिककडे जाणारी शाइन क्रमांक MH-15-CZ-9553 यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर नर्सरीजवळ धडक झाली. या धडकेत बाळू रामदास थाळकर (वय-32 रा. हेदपाडा), युवराज मोतीराम बोंबले (वय-22 रा.लिंगवणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिल हरिदास म्हसरे हा जखमी झाला आहे. याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे (रा.हेदपाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.सी. जाडर पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा -...आणि एका शब्दामुळे 'तो' अडकला पोलिसांच्या जाळ्यात