मनमाड -मनमाड जवळ असणाऱ्या "हडबीची शेंडी"(शेंडीचा डोंगर) येथे दोन गिर्यारोहकांचा ट्रेकिंग करताना मृत्यू झाला ( Shendicha Dongar Trekker Death ) आहे. खाली उतरताना खिळा निसटून 110 फूट खाली पडल्याने हा अपघात झाला आहे. अनिल वाघ आणि मयूर मस्के, अशी त्या गिर्यरोहकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेंडीच्या डोंगरावर अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकिंग व्यवसायिक ग्रुपचे 8 महिला आणि 7 पुरुष सदस्य आले होते. यावेळी ट्रेकिंग करुन 13 जण सुखरुप खाली उतरले. मात्र, सगळ्यांना खाली उतरवून ट्रेनर अनिल वाघ आणि मयूर मस्के खाली येत असताना खिळा निसटून दोघे 110 फूट खाली पडले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एकजण गंभीर होता. त्याचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे.