नाशिक - गोरगरिब व निराधारासाठी कल्याणकारी ठरलेल्या संजय गांधी निराधार योजनेत नाशिक जिल्ह्यात दोन हजार बोगस लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. बोगस लाभार्थ्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी गंगाधरण.डी यांनी दिला आहे.
नाशकात संजय गांधी निराधर योजनेचे दोन हजार बोगस लाभार्थी - नाशिक संजय गांधी निराधर योजनेचे दोन हजार बोगस लाभार्थी
जिल्ह्यात या योजनेत अनेकजण दुबार अनुदान लाटत असल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या सॉफ्टवेअरच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासणीत अनेक लाभार्थ्यांचे नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात ५३०, दिंडोरी ३५०, मालेगाव ३५०, बागलाण १३८ व नाशिक ग्रामीण २१ दुबार लाभार्थी सापडले असून इतर तालुक्यांची तपासणी तहसिलदार रचना पवार यांच्याकडून सुरु आहे. जिल्हाप्रशासनाने हे प्रकरण गंभीर घेतले असून दुबार लाभार्थी सिध्द झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
सॉफ्टवेअरच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर - संजय गांधी निराधार याजनेचे जिल्ह्यात दोन लाख २० हजार लाभार्थी आहे. या योजनेतंर्गत श्रावणबाळ, इंदिरागांधी वृध्पकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदींचा समावेश होतो. त्यात ६५ वर्षा आतील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, निराधार व विधवा महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी आदींना दरमहा हजार रुपये अनुदान मिळते. मात्र, जिल्ह्यात या योजनेत अनेकजण दुबार अनुदान लाटत असल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या सॉफ्टवेअरच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासणीत अनेक लाभार्थ्यांचे नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात ५३०, दिंडोरी ३५०, मालेगाव ३५०, बागलाण १३८ व नाशिक ग्रामीण २१ दुबार लाभार्थी सापडले असून इतर तालुक्यांची तपासणी तहसिलदार रचना पवार यांच्याकडून सुरु आहे. जिल्हाप्रशासनाने हे प्रकरण गंभीर घेतले असून दुबार लाभार्थी सिध्द झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.