नाशिक - सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.काम अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे अनेक विद्यार्थी एम लॉ या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाशिकच्या पुणे विद्यापीठ उपकेंद्रात आंदोलन करण्यात आले.
नाशकात राष्ट्रवादी अन् एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनांच्या भांडणात विद्यार्थ्यांचा मुद्दा राहिला बाजूला - pune University
एबीव्हीपी आणि एनसीपीचे कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की झाली. मात्र, वेळीच सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यांचे सरकार असताना आंदोलनाचे नाटक का करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या विद्यार्थी सेना सदस्यांनी उपस्थित केला.
याच वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एबीव्हीपी आणि एनसीपीचे कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. मात्र, वेळीच सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यांचे सरकार असताना आंदोलनाचे नाटक का करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या विद्यार्थी सेना सदस्यांनी उपस्थित केला. मात्र, दोन विद्यार्थी संघटनेच्या भांडणात विद्यार्थ्यांचा मुद्दा बाजूला राहिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही संघटनेच्या सदस्यांना सरकारवाडा पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले.