नाशिक -अन्नातून वा पाण्यातून विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असून उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन विद्यार्थांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Students Died Poisoning In Nashik District तर, अन्य चार विद्यार्थ्यांवर इगतपुरीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला हाेता.
Poisoning नाशिक जिल्ह्यात निवासी विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा हाेऊन दाेन मुलांचा मृत्यू - अनुसया गतिमंद निवासी विद्यालयातील विषबाधेची घटना
इगतपुरी तालुक्यातील अनुसया गतिमंद निवासी विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा हाेऊन दाेन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Two students died due to poisoning ही घटना आज बुधवारी दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे. यामध्ये सात ते आठ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, यातील दाेन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज ईगतपुरीच्या अनुसूया मतिमंद शाळेत. १०० मूल शिक्षण घेत आहेत. १०० मुलांपैकी काही मुलांना मंगळवारी रात्री जुलाब आणि उलटी होऊ लागल्याने रात्री त्यांना प्राथमिक उपचार करून शाळेत आणण्यात आले. परंतु, पहाटे परत त्रास सुरू झाल्याने त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हर्षल गणेश भोयेर रा. भिवंडी वय २३ मोहमद जुबेर शेख वय ८ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -खेर अफजल खान वध देखाव्याला पोलिसांनी दिली परवानगी, कोथरूड पोलिसांनी केला होता विरोध