नाशिक-कोरोना संकटाच्या काळात जनतेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून अभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन दोन बहिणींनी पोलिसांना भेट दिले आहे. नाशिक शहरातील सौख्या अमित कुलकर्णी या मुलीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत बहिणीसोबत चित्रपटात काम केल्याबद्दल मिळालेले ५१ हजारांचे मानधन शहर पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण निधीसाठी भेट म्हणून दिले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी धनादेश स्वीकारला. त्यांनी सौख्या व सौम्या कुलकर्णी या दोघी लहान बहिणींनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कौतुकास्पद...बाल अभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन दोन बहिणींनी पोलीस कल्याण निधीला दिले - Soumya kulkarni news
सौख्या व सौम्या या दोघी बहिणींनी चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना मिळालेल्या मानधनाच्या रकमेचा धनादेश पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांना देऊ केला. पाटील यांनी सौख्या व सौम्या कुलकर्णी या दोघी लहान बहिणींनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
नाशिक शहरात राहणाऱ्या सौख्या अमित कुलकर्णी हिचा बुधवारी (दि.५) वाढदिवस होता.तिने तिच्या मोठ्या बहिणीसोबत चित्रपटांत काम केल्याने मिळालेले ५१ हजारांचे मानधन पोलीसांच्या कल्याण निधीसाठी देत सामाजिक बांधीलकी जपत इतरांनाही प्रेरणा दिली. सौख्याने तिचा वाढदिवस कोरोना योध्दा म्हणून शहराच्या नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना मदत करून साजरा करण्याचे ठरविले. तिने तिची भावना आई वडिलांकडे व्यक्त केली.पालकांनीही या गोष्टीला होकार दिला.
सौख्या व सौम्या या दोघी बहिणींनी चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना मिळालेल्या मानधनाच्या रकमेचा धनादेश पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांना देऊ केला. दोघींनी इतक्या कमी वयात सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.