नाशिक -मालेगाव शहरातील सोनिया कॉलनीमधून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन पिस्तुलं आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली. यात एका इंग्लिश आणि एका गावठी बनावटीच्या पिस्तुलाचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी हारून खान अय्युब खान(वय-34) या तरुणाला अटक केली आहे.
मालेगावात दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त; एकाला अटक - मालेगाव पोलीस
मालेगाव शहरात किरकोळ गुन्हे करणाऱ्या आरोपींकडे गावठी आणि इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सोनिया कॉलनीमधून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन पिस्तुलं आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली.
हेही वाचा -नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण; जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
मागील एका महिन्यात पिस्तुल जप्त करण्याची ही पाचवी घटना असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मालेगाव शहरात किरकोळ गुन्हे करणाऱ्या आरोपींकडे गावठी आणि इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मागील एका महिन्यात 5 पिस्तुलं आणि 10 पेक्षा जास्त काडतुसे जप्त करण्यात आली आहेत तर 5 आरोपींना जेरबंद केले आहे.