नाशिक :त्यानंतर या भागात वन विभागाने पिंजरे लावले. आज 2 जानेवारी रोजी सकाळी अलगद बिबट्या जेरबंद (Leopards Jailed In Nashik) झाला. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.इगतपुरी तालुक्यातील तळेगांव येथील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांना सकाळच्या सुमारास बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. (Leopard attack on man) त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले असता बिबट्या एका ठिकाणी बसलेला दिसून आला. यावेळी गणच्या मदतीने बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. (man killed in leopard attack) मात्र यानंतर सुद्धा बिबट्या या परिसरात फिरत होता. यानंतर वन विभागाच्या पथकाने हिंमत करत बिबट्यावर अलगद जाळी टाकून त्याला जेरबंद केले. यावेळी वनविभागाने दाखवलेल्या धाडसाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. (Latest news from Nashik)
Leopards Jailed In Nashik: नाशिकमध्ये दोन बिबटे जेरबंद, वन विभागाच्या धाडसाचे कौतुक - Leopards Jailed In Nashik
इगतपुरी तालुक्यातील तळेगांव आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळूजे येथे दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला (Leopards Jailed In Nashik) यश आले आहे. या भागात गेल्या महिन्याभरापासून नागरिक भीतीच्या सावटा खाली होते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात 24 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी सात वाजता घरात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या हरीश दिवटे याच्यावर बिबट्याने झडप टाकून (Leopard attack on man) त्याला उचलून नेले होते. वन विभागाच्या पथकाने शोध घेतल्यानंतर अडीच तासाने अर्धा किलोमीटर दूर वाघेरा रस्त्यावर झाड झुडपात हरीशचा मृतदेह सापडला (man killed in leopard attack) होता. (Latest news from Nashik)
बिबट्याचे हॉटस्पॉट :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड,त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी :नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाही. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.