महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Two Girl Burnt In Nashik : कुत्र्याच्या भांडणात झोपेत असलेल्या सख्या बहिणी भाजल्या, नाशिकच्या देवरगाव येथील घटना - नाशिक दोन मुली भाजल्या

आज सकाळी चुलीवर ( Two Girl Burnt In Nashik ) अंघोळीसाठी पाणी गरम ठेवल्यानंतर घरातील एक कुत्रा आणि बाहेरील ( Nashik Girl Burnt Due To Dog Fight ) एक कुत्रा या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणामुळे सांडलेले पाणी दोन मुलीच्या अंगावर गेल्याने त्या भाजल्या गेल्या आहेत.

Two Girl Burnt In Nashik
Two Girl Burnt In Nashik

By

Published : Apr 7, 2022, 4:16 PM IST

Updated : Apr 7, 2022, 4:58 PM IST

नाशिक - आज सकाळी चुलीवर ( Two Girl Burnt In Nashik ) अंघोळीसाठी पाणी गरम ठेवल्यानंतर घरातील एक कुत्रा आणि बाहेरील ( Nashik Girl Burnt Due To Dog Fight ) एक कुत्रा या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात जवळच चुलीवर ठेवलेले गरम पाणी खाली पडले. हे पाणी वाहत मुलींच्या अंगाखाली गेल्याने रुपाली कराटे आणि पल्लवी कराटे या दोन मुली भाजल्या गेल्या आहेत. गैरने गावापासून काही अंतरावर असलेल्या देवरगाव येथे ही घटना घडली आहे.

नातेवाईकांची प्रतिक्रिया

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू -कुत्र्याचे भांडणात दोन चिमुकल्या मुली भाजल्याची दुर्घटना नाशिक तालुक्यातील गैरने गावापासून काही अंतरावर असलेल्या देवरगाव येथे घडली आहे. देवरगाव येथे कराटे कुटूंबीय राहतात. त्यांनी आज सकाळी चुलीवर अंघोळीसाठी पाणी गरम करण्यास ठेवलेले होते. यावेळी घरातील एक कुत्रा आणि बाहेरील एक कुत्रा या दोघांमध्ये भांडणे सुरु होते. या भांडणात चुलीवर ठेवलेले गरम पाणी खाली पडले आणि हे पाणी वाहत झोपलेल्या दोन मुलींच्या अंगाखाली गेले. या घटनेत रूपाली कराटे आणि पल्लवी कराटे या दोघीही भाजल्या असून या चिमुकली रूपाली ही 60 ते 70 टक्के भाजली आहे, तर तिची मोठी बहीण पल्लवी ही किरकोळ भाजली आहे. या दोघीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघींची प्रकृती सध्या स्थिर -दोन कुत्र्यांचे भांडण मात्र, या निष्पाप चिमुकल्यावर बेतले आहे. रूपाली आणि पल्लवी या दोघा सख्ख्या बहिणी असून सकाळी झोपेत असतानाच उकळता गरम पाण्याने त्या भाज्या गेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून दोघींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हेही वाचा-MNS Rally In Thane : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी, ठाण्यात 9 एप्रिलला होणार सभा

Last Updated : Apr 7, 2022, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details