नाशिक :नाशिकच्या सातपूर काही जण उत्तर प्रदेशात मित्राच्या लग्नासाठी गेले होते. तेथे हॉटेलमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे भाजलेले दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत (two friends died in Gas leak in hotel in UP) आहे.
गॅस गळतीमुळे आग : मिळालेल्या माहितीनुसार सातपूर येथील हॉटेल भोलेनाथच्या संचालकांच्या मुलाचे लग्न उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे होते. या लग्नासाठी सातपूरमधील सात जण स्कॉर्पिओ या वाहनेने गेले होते. 8 डिसेंबरला लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते देवदर्शनासाठी लखनऊ येथे गेले (two friends died in Gas leak) होते. तेथे त्यांनी हॉटेलचा रूम बुक करून तेथे मुक्काम केला. रात्री हॉटेलच्या खालीच असलेल्या बिर्याणी कॉर्नर येथे बादशाह व प्रकाश हे दोघे मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. उर्वरित पाच मित्र हॉटेलमधील रूममध्येच होते. याचवेळी बिर्याणी कॉर्नरच्या हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन आग लागली. यात प्रकाश दाते हा शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर बादशहा 70 टक्के भाजल्याने त्याच्यावर लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू (Gas leak in hotel) होते.