नाशिक- जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा येथे सहली साठी आलेल्या 5 जिवलग मित्रांपैकी 2 दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून. 3 जणांना वाचवण्यात स्थनिक गावकऱ्यांना यश आले आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. शुभम नारायण गुजर (वय 18) आणि ऋषिकेश शशिकांत तोटे (वय 18, रा. वडाळीभोई, चांदवड) अशी मृतांची नावे आहेत.
धबधब्याच्या पाण्यात पोहण्याची हौस बेतली जीवावर;दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू.. - two friends died in chorchawadi waterfall
चांदवड तालुक्यातील 5 मित्र देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा पाहण्यासाठी आले होते. ते सर्वजण धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघांनाही पोहता येत नव्हते.
चांदवड तालुक्यातील वडाळीभुई येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर, ऋषिकेश तोटे हे मित्र देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. पाचही जण धबधब्याच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडू लागले. पाचपैकी अजिंक्य, सागर आणि संकेत या तिघांना बऱ्यापैकी पोहता येत नसल्याने हे तिघे ही गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर आले. मात्र, शुभम व ऋषिकेश या दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोघांना शोधण्यासाठी गावातील पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. एक तासाच्या शोध मोहिमेनतंर या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघांचे मृतदेह सापडले तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते. शुभम आणि ऋषिकेश एकमेकांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जलसमाधी मिळाली असावी, असा अंदाज शोधकार्य करणाऱ्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.