महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकींच्या अपघातात दोन ठार, चार जखमी - देवळा दुचाकी अपघात

नाशिकमधील देवळा तालुक्यात दुचाकींच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. जनार्दन देवरे आणि गुलाब सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चारजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Dead People
मृत जनार्दन देवरे व गुलाब सोनवणे

By

Published : Mar 13, 2020, 1:48 PM IST

नाशिक -देवळा तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महाल-पाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -नाशिक : मनमाडला शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

गुरुवारी (१२ मार्च) दहीवड येथील पानसरे कुटुंबीयांनी नियोजित केलेला विवाह समारंभ अमरावतीपाडा (ता. सटाणा) येथे होणार होता. त्यासाठी दहीवड येथील जनार्दन अर्जुन देवरे (वय ४५) हे पत्नी उज्ज्वलासह दुचाकीने गेले होते. तर रण्यादेवपाडा येथील गुलाब राजाराम सोनवणे (वय ४०) हे पत्नी सरला (वय ३५), मुलगा किरण (वय १२) आणि भाचा कार्तिक नीलेश पवार (वय ४) यांच्यासह दुचाकीने मेशी येथे आले होते. गावाकडून परतत असताना मेशीजवळ देवरे आणि सोनवणे यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघाताच्या या घटनेत जनार्दन देवरे आणि गुलाब सोनवणे जागीच ठार झाले. उज्ज्वला देवरे, सरला सोनवणे, कार्तिक पवार आणि किरण सोनवणे हे जखमी झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details