नाशिक -गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 54 हजार 877 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 152 गावातील 69 हजार 269 शेतकरी बाधित झाल्याचे शासनाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
कायम दुष्काळी तालुके म्हणून नांदगाव, मालेगाव तालुक्यांना मागील दोन दिवसात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. फळबागांची पुरती वाट लागली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 54 हजार 877 हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. तर 7 हजार कोंबड्या मृत पावल्या असून 104 घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे.
हे ही वाचा -साकीनाकातील निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे- भाई जगताप
खालील पिकांचे सर्वाधिक नुकसान
पीक | हेक्टरी नुकसान |
बाजरी | 7,676 हेक्टर |
मका | 6 हजार 936 हेक्टर |
ज्वारी | 25 हेक्टर |
तूर | 3.30 हेक्टर |
कापूस | 15,250 हेक्टर |
कांदा | 6 हजार 183 हेक्टर |
कांदा रोप | 863 हेक्टर |
भाजीपाला | 344 हेक्टर |
डाळिंब | 5 हेक्टर |
द्राक्ष | 6.67 हेक्टर |
सोयाबीन | 180 हेक्टर |