नाशिक- मालेगाव येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन अधिकारीच कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आरोग्यमंत्री आढावा घेत असताना मालेगाव महानगरपालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी मंत्री आणि अधिकारी यांच्यात संवाद सुरू होता.
धक्कादायक : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन अधिकारीच कोरोनाबाधित - corona positive officers meeting rajesh tope
दरम्यान, संवाद संपताच कोरोनाची बाधा झालेल्या अधिकाऱ्यांनी रिसिव्ह न करता आलेल्या फोनवर संपर्क केला आणि आपल्याला कोरोनाची बाधा झाली आहे. आपण तातडीने रुग्णालयात दाखल व्हा, अशी विनंती केली.
दरम्यान, संवाद संपताच कोरोनाची बाधा झालेल्या अधिकाऱ्यांनी रिसिव्ह न करता आलेल्या फोनवर संपर्क केला आणि आपल्याला कोरोनाची बाधा झाली आहे. आपण तातडीने रुग्णालयात दाखल व्हा, अशी विनंती केली. यावेळी बैठक सुरू असतानाच दोन्हीही अधिकारी बाहेर पडले. हीच बातमी बैठकीत काही क्षणात फिरल्याने एकच खळबळ उडाली होती.