महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 22, 2019, 7:40 PM IST

ETV Bharat / state

नाशकात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 44 लाख रुपये लंपास

नाशिक शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेल रोड आणि मखमालाबाद येथील एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. काल (बुधवार) रात्री अवघ्या दोन तासातच दोन एटीएम फोडून 44लाख 75 हजार रूपये चोरट्यांनी लांबवले.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र सुरूच, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 40 लाख रुपये लंपास

नाशिक - शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेल रोड आणि मखमालाबाद येथील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. मखमालाबाद येथे भरवस्तीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून 31 लाख 75 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या एका एटीएममधून 13 लाख रुपये लंपास केले आहेत.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र सुरूच, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 40 लाख रुपये लंपास
तांत्रिक कारणांमुळे बुधवारी मखमालाबाद गावातील स्टेट बँकचे एटीएम बंद होते. त्यानंतर आज (गुरूवार) सकाळी बँकेचा कर्मचारी एटीएम केंद्र उघडण्यासाठी आला तेव्हा, चोरी झाल्याचे लक्षात आले. तर जेल रोड येथील एटीएम मशीनरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या ठिकाणी चोरट्यांनी 13 लाख लंपास केले आहेत. विशेष म्हणजे काल रात्री अवघ्या दोन तासातच दोन एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बव 44 लाख 75 हजार रुपये लांबवले आहेत.
स्टेट बँकेच्या या दोन्ही एटीएममध्ये स्टेट बँकेचे सुरक्षा रक्षक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोराट्यांनी एटीएम कक्षातील कॅमेरे बंद करून मोठ्या शिताफीने ही चोरी केली. दोन एटीएम फोडून नाशिक पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details