महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Illegal Liquor Confiscated : पाथर्डीत १० लाखाच्या अवैध दारुसह दोघांना अटक - पाथर्डीत अवैध दारु तस्करांना अटक

अवैध मद्य निर्मिती वाहतूक विरोधात उत्पादन शुल्काने धाडसत्र सुरु केले आहे. खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनूसार विभागाने पाथर्डी फाटा येथे सापळा रचला. याठिकाणी वाहनांची तपासणी करताना एका चारचाकी वाहनात विविध प्रकारच्या मद्याच्या १०५ बाॅक्स मिळून आले. यात अतुल कांबळे व सचिन कांबळे यांना अटक करण्यात आली असून हे दोघेही कोल्हापूरचे आहेत.

दारु
दारु

By

Published : Nov 18, 2021, 12:55 AM IST

नाशिक - राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने (State Excise Squad) धडक कारवाई करत पाथर्डी फाटा येथे दहा लाख रुपये किंमतीचे (Illegal Liquor Confiscated) दारु जप्त केले आहे. चोरट्या पध्दतीने हे मद्य विक्रीसाठी नेले जात होते. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या या दणक्याने चोरट्या पध्दतीने मद्य वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.


अवैध मद्य निर्मिती वाहतूक विरोधात उत्पादन शुल्काने धाडसत्र सुरु केले आहे. खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनूसार विभागाने पाथर्डी फाटा येथे सापळा रचला. याठिकाणी वाहनांची तपासणी करताना एका चारचाकी वाहनात विविध प्रकारच्या मद्याच्या १०५ बाॅक्स मिळून आले. यात अतुल कांबळे व सचिन कांबळे यांना अटक करण्यात आली असून हे दोघेही कोल्हापूरचे आहेत. मद्य गोवा राज्यात विक्रीस परवानगी असून महाराष्ट्रात मात्र विक्रीवर बंदी आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने या कारवाईत एम.एच.०९.सीए.५२७६ पीकप वाहन जप्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details