नाशिक - मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना कोरोनाची लागण होऊन उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना बुधवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव व जाकीर हुसेन रुग्णालयातून ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात २८ पोलीस तसेच शहरातील इतर आठ रुग्णांचा समावेश आहे.
अठ्ठावीस पोलीस कोरोनामुक्त, आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज - rajesh tope news
मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना कोरोनाची लागण होऊन उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना बुधवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात २८ पोलीस तसेच शहरातील इतर आठ रुग्णांचा समावेश आहे.
या पोलिसांना निरोप देताना पोलीस बॅण्डने ‘हम होंगे कामयाब’ची धुन वाजवून आरोग्य व पोलीस यंत्रणेला लढण्याचे बळ दिले. तेव्हा कोरोनामुक्त पोलिसांच्या चेहऱ्यावरही आत्मविश्वासाची लकेर उमटली होती. मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या ३३ पोलिसांना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले.
रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी राजेश टोपे यांच्यासह विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , आमदार दिलीप बनकर, मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार उपस्थित होते.