नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील फार्म हाऊसवर येऊन वास्तव्य केल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदीत परमोरीच्या फार्म हाऊसमध्ये 12 जण वास्तव्यास, नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल - parmori farm house news
शुक्रवारी सकाळच्या सुमारास 12 लोक परमोरी येथील खासगी फार्म हाऊसवर आल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. सध्या कोरोनामुळे जनजागृती व भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरीक सतर्क झाले आहेत. ग्रामस्थांनी ही माहिती परमोरीचे ग्रामसेवक भालचंद दिपचंद बोरसे यांना कळविली. त्यांनी याबाबत वणी पोलीसांना कळवले. माहितीच्या आधारे सपोनी प्रवीण पाडवी व सहकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली व संबधित लोकांना पोलीस ठाण्यात आणले.
नाशिकच्या इंदिरानगर भागातून समूहाने येऊन दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील खासगी फार्म हाऊसमध्ये वास्तव्य केले. लॉकडाऊनचे नियम मोडत शासकीय आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या 12 लोकांवर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यातआला आहे. याबाबतची माहीती अशी केतन मगनभाई लाडानी (वय 40) राहणार इंदिरानगर यांच्या मालकीचे परमोरी येथे फार्म हाऊस आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास 12 लोक या ठिकाणी आले असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. सध्या कोरोनामुळे जनजागृती व भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरिक सतर्क झाले आहेत. अनोळखी व्यक्ती, समूह, अपरिचित चेहरे याबाबत सतर्क असलेल्या ग्रामस्थांनी ही माहिती परमोरीचे ग्रामसेवक भालचंद दिपचंद बोरसे यांना कळविली. सदर माहिती वणी पोलीसांना देण्यात आली. माहितीच्या आधारे सपोनी प्रवीण पाडवी व सहकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली व संबधित लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
याप्रकरणी केतन मगनभाई लाडाणी (वय 40), विनोदभाई हंसराजभाई कमानी (वय 52), हिरेन प्रभुदास भाडजा (वय 32), भाविन रसिकभाई कन्शाग्रा (वय 28), रणजीत सुभाष भोर (वय 39), क्रिष्णा भाविन पटेल (वय 24), दर्शना हिरेन भाडेजा (वय 32), स्नेहल केतन लाडानी (वय 31), भावना विनोद कमानी (वय 48), दक्ष केतन लाडानी (वय 15), दर्शक विनोदभाई कमानी (वय 18), बन्टु मंगला जाधव (वय 30), सर्व राहणार इंदिरानगर परिसर यांच्यावर विविध बारा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनी प्रवीण पाडवी करत आहेत.