येवला (नाशिक) - मत्स्यविक्रीच्या दुकानात अवैधरित्या कासव आणि पोपट विकणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. तर आरोपीकडून 17 कासव आणि 7 पोपटही जप्त करण्यात आली आहे.
येवला वनविभागाची कारवाई -
येवला (नाशिक) - मत्स्यविक्रीच्या दुकानात अवैधरित्या कासव आणि पोपट विकणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. तर आरोपीकडून 17 कासव आणि 7 पोपटही जप्त करण्यात आली आहे.
येवला वनविभागाची कारवाई -
येवला वन परिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या मनमाड शहरात ए वन पेट शॉप नावाचे दुकान आहे. याठिकाणी मत्स्य विक्रीचा व्यवसाय चालतो. मात्र, या दुकानात अवैधरित्या कासव विकली जात असल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. वनविभागाच्या हॅलो फोरेस्ट या टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी येवला व नांदगाव यांनी या दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानातील लहान मोठे असे 17 कासव तर 7 पोपट जे वन्यप्राणी संरक्षण अधिनियमात येतात. म्हणून वनविभागाच्या पथकाने ते जप्त करत या गुन्ह्यातील संशयित आरोपीस अटक केली.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पुढील चौकशीसाठी दोन दिवसांची फॉरेस्ट कस्टडी दिली असल्याची माहिती सहाय्यक वनरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी दिली आहे. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने विक्री केलेल्या खरेदीदारांचा तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -16 कोटींचं इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू; दुर्मिळ आजाराने होती ग्रस्त