महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा 'तुलसी विवाह', अश्व नृत्याचा थरार - नाशिक बातमी

या विवाह सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे अश्व नृत्याच्या थरार पाहायला मिळाला. तसेच अनेक बँड पथकांनी या विवाह सोहळ्याला मोफत हजेरी लावून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. यावेळी बँड पथकांची जुगलबंदी बघायला मिळाली.

जिल्ह्यातील सर्वात मोठा 'तुलसी विवाह' संपन्न

By

Published : Nov 10, 2019, 5:49 PM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे भव्य तुलसी विवाह हजारोंच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला. शुक्रवारी सकाळी मांडव डहाळे यांचा कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दिवट्या बुधल्या यांचा कार्यक्रम तसेच तुळशीला हळद लावण्याचा कार्यक्रम झाला. शनिवारी सकाळी बहुसंख्य बैलगाड्यांच्या उपस्थित गावभर मिरवणूक झाली. तसेच सायंकाळी गोरज मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तुलसी विवाह चिंचखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जिल्ह्यातील सर्वात मोठा 'तुलसी विवाह' संपन्न

हेही वाचा -मनमाडला ख्रिस्ती समाजातर्फे हंगाम सण साजरा

या विवाह सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे अश्व नृत्याच्या थरार पाहायला मिळाला. तसेच अनेक बँड पथकांनी या विवाह सोहळ्याला मोफत हजेरी लावून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. यावेळी बँड पथकांची जुगलबंदी बघायला मिळाली. तुलसी विवाह सोहळा मध्येच एका जोडप्याचा विवाह पार पडला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

हेही वाचा - महाराष्ट्रात लवकरच 'रामराज्य' येईल - गिरीश महाजन

या कार्यक्रमाला खासदार भारतीताई पवार यांच्यासह अनेक राजकारणी मंडळी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाला उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्याला जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली होती. या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details