महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात; चालक जखमी - सुरगाणा रेशन वाहतूक ट्रक अपघात

धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याचे समजताच तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Truck Accident
ट्रक अपघात

By

Published : Jul 15, 2020, 12:44 PM IST

नाशिक -सुरगाणा तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हा अपघात चिराई घाटातील वळणावर झाला. पावसाची रिपरिप सुरू असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक यशवंत कुमार राजकुमार धृरु (वय 25, रा. सामोरा, ता. बागबहास, छत्तीसगढ) किरकोळ जखमी झाला असून त्याच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे.

रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात

धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याचे समजताच तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाऊस सुरू असल्याने धान्य झाकण्यासाठी गोदामातून ताडपत्रींची व्यवस्था करण्यात आली. पलटी झालेल्या ट्रकमधील रेशनच्या गहू व तांदळाची वाहतूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ट्रकमध्ये तीस टन धान्य भरलेला होता यातील दहा ते बारा क्विंटल धान्य पावसात भिजून खराब झाले आहे. हे धान्य ठेकेदाराला परत करण्यात येईल, असे सुरगाणा तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details