नाशिक- विंचूर - प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला. ही घटना सोमवारी (१३ मे) घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
...अन् दोन पुलांच्या मधोमध जाऊन आदळला ट्रक - प्रकाशा
विंचूर - प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला

नाशिक ते नंदुरबार विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात वेगाने वाळू वाहतूक नंदुरबार येथून होत असते. वाळू वाहतूक करत असताना चालक मद्य प्रशासन करून आणि क्षमतेपेक्षा जास्तमध्ये वाळू ट्रकमध्ये भरून जलदगतीने ये-जा करतात. अनेकवेळा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन मोठे अपघात झाले आहेत. तरीदेखील वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकांविरूद्ध तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही म्हणून असे अपघात होत असल्याचे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.
दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या जागेत ट्रक अडकल्याने रुंद पुलावर अपघाताची घटना घडल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.