महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shravan Monday: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दार सलग दुसऱ्यावर्षी भाविकांसाठी बंदच, पोलीस बंदोबस्त तैनात - श्रावण सोमवार लेटेस्ट न्यूज

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात विशेष म्हणजे या महिन्यातील सोमवारी हजारो भाविक दूरदूर वरून दर्शन घेण्यासाठी येथे येतात. मात्र, यंदा कोरोनाचे नियम शिथिल केले असले तरी भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंदच ठेवण्यात आली आहेत.

trambkeshwer Mahadev  temple nashik
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दार सलग दुसऱ्यावर्षी भाविकांसाठी बंदच

By

Published : Aug 9, 2021, 10:51 AM IST

नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सलग दुसऱ्यावर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दारे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, असे असले तरी दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिरात पुजाऱ्यांच्या उपस्थित कोरोनाचे सर्व नियम पाळून विधिवत पूजा आणि आरती केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वरमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरातून प्रतिनिधी

विशेष पोलीस बंदोबस्त -

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात विशेष म्हणजे या महिन्यातील सोमवारी हजारो भाविक दूरदूर वरून दर्शन घेण्यासाठी येथे येतात. मात्र, यंदा कोरोनाचे नियम शिथिल केले असले तरी भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंदच ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर देखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मोजक्याच पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

गोदावरीच्या उगमस्थानी -

नाशिक शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे अतिप्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या उमगस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिराचाजिर्णोधार हा इ.स. 1755 ते 1780 मध्ये यांनी नानासाहेब पेशवे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत असून या पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला आहे. तर भगवान शिवाचे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे.

दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा -

दर बारा वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांनीमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी, आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहे. याच तीन आखाडे यांच्या नेतृत्वाखाली, शैवाचे आखाडे ही त्र्यंबकेश्वरात जमतात. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देखील असल्याने त्र्यंबकेश्वरला विशेष महत्त्व असून वर्षभर देशातून भाविक येथे येत असतात.

हेही वाचा - Delta Variant : नाशिक जिल्ह्यात आढळले डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details