नाशिक - मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात केलेला निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने मालेगाव महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अमरावती येथील जिल्हा प्रशासन अधिकारी त्र्यंबक कासार यांची नाशिक मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी त्र्यंबक कासार यांची नियुक्ती - nashik updates
सरकारने मालेगाव महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अमरावती येथील जिल्हा प्रशासन अधिकारी त्र्यंबक कासार यांची नाशिक मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाने वैद्यकीय कारण दाखवत बोर्डे यांची बदली केली असली तरीही मालेगावातील वाढती रुग्णांची परिस्थिती पाहता या बदलीमागे त्यांचा हलगर्जीपणाच असल्याचेही सांगितले जाते आहे. कोरोनाच्या काळात आतापर्यंत दोन निष्क्रिय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
यापूर्वी लक्ष्मण राऊत अपर जिल्हाधिकारी होते त्यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी नंदुरबार येथील धनंजय निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कळवण येथील प्रांत डॉ. पंकज आशिया यांची मालेगाव विशेष समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात आत्तापर्यंत दोन निष्क्रिय अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली आहे.