महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टिकटॉकवरून आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आदिवासी संघटनेचे निषेध आंदोलन - योगेश गावित

टिक टॉक अ‌ॅप वरून आदिवासी महिला संदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ केल्यामुळे आदिवासी समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून पेठ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन गीतांजली पगार हिचा फोटो जाळुन निषेध केला.

गीतांजली पगार

By

Published : Sep 15, 2019, 10:42 PM IST

नाशिक -गीतांजली पगार या तरुणीने टिक टॉक या सोशल मीडिया अ‌ॅपवर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या तरुणी विरोधात अ‌ॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात आदिवासी समाज आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

टिकटॉक वरून आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेठे येथे अदिवासी संघटनेचे निषेध आंदोलन

हे ही वाचा -मित्राने बायकोसोबत व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रिनशॉट दाखवल्याने पत्नीचा गळा आवळून खून

टिक टॉक अ‌ॅप वरून आदिवासी महिला संदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ केल्यामुळे आदिवासी समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून पेठ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन गीतांजली पगार हिचा फोटो जाळुन निषेध केला. याप्रसंगी महिलांसह गणेश गवळी निवृत्त अधिकारी एकनाथ भोये, अरुणा वारडे , छगन चारोस्कर, देविदास कामडी, राकेश दळवी, चिंतामण खंबाईत, नेताजी गावित, योगेश गावित, विलास जाधव उपस्थित होते.

हे ही वाचा -थरारक.. मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details