नाशिक - संचारबंदीच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी अनेकजण स्वयंसेवक म्हणून पुढे येत आहेत. नाशिकमध्ये पोलिसांच्या मदतीला तृतीयपंथी समाज धावून आला आहे. नाशिक रोड परिसरात हे तृतीयपंथी रस्त्यावर उतरून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत.
नाशकात तृतीयपंथीयांची पोलिसांना मदत, नागरिकांमध्ये केली जनजागृती - तृतीयपंथीयांनी नागरिकांमध्ये केली जनजागृती
नाशिकमध्ये पोलिसांच्या मदतीला तृतीयपंथी समाज धावून आला आहे. नाशिक रोड परिसरात हे तृतीयपंथी रस्त्यावर उतरून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. रस्त्यावरील नाकाबंदी असो किंवा बेजबाबदार नागरिकांना समज देणे असो, प्रत्येक काम ते अगदी मनापासून करताना दिसून येत आहेत.
रस्त्यावरील नाकाबंदी असो किंवा बेजबाबदार नागरिकांना समज देणे असो, प्रत्येक काम ते अगदी मनापासून करताना दिसून येत आहेत. आपणही समाजातील एक घटक असून संचारबंदीच्या काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस बांधवांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे नाशिक किन्नर आखाड्याच्या पायल नादगिरी यांनी सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर पडताना सुरक्षा साहित्याचा वापर करावा. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलीस प्रशासन तुमच्यावर कारवाई करेल, असा समज तृतीयपंथीकडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना देण्यात येत आहे. आता तरी नागरिकांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशीच त्यांची अपेक्षा आहे.