महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली... - शरद पवार नाशिक दौरा बातमी

महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता नसताना मार्च 2020 मध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

transfer-of-municipal-medical-officers-in-nashik
नाशकात मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली...

By

Published : Jul 24, 2020, 1:30 PM IST

नाशिक- शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता नसताना त्यांची मार्च 2020 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर आता अहमदनगर जिल्हा परिषदेचे डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशकात मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. तर 400 हून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या संदर्भातील आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज दुपारी नाशिकला आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व आधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पवार यांच्याकडून जिल्ह्यात कोरोना बाबतचा आढावा घेतला जाणार असून याबाबत महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींचे म्हणणे देखील समजून घेणार असून शरद पवार काही सूचना देखील करतील, असे सांगितले जात आहे.


मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली...
महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता नसताना मार्च 2020 मध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्र्यंबके यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा रोखण्यात अपयश आले. आणि आजच्या शरद पवार यांच्या बैठकीत डॉ. त्र्यंबके यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्तीबाबत लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करुन मनपा आयुक्तांना अडचणीत आणू शकता. या पार्श्वभूमीवर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून अहमदनगरचे जिल्हा परिषदेचे डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्त करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details