महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारविरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ट्रॅक्टर मोर्चा - Uddhav Thackeray

Thackeray Group Marcha : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतीचे नुकसान (Farmers Issue) झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी ठाकरे गटाने अनेक बैलगाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Nashik News
जिल्हाधिकारी कार्यालयावर टॅक्टर मोर्चा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:43 PM IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

नाशिक Thackeray Group Marcha: नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतीचे नुकसान (Farmers Issue) झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने अनेक बैलगाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टाळ-मृदुंगाच्या गजरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बैलगाडी मोर्चाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा: आठ दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील 35 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याऐवजी सत्ताधारी घटक पक्ष निवडणूक प्रचारात दंग राहिले होते. ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचा आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शालिमार येथील पक्ष कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात 25 हून अधिक बैलगाड्या, काही ट्रॅक्टर सहभागी होते. एका बैलगाडीचे सारथ्य ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. बैलगाड्यांमध्ये काही जण टाळ-मृदुंग घेऊन बसले होते. त्यांच्यामार्फत भजनाच्या सुरात शेतकऱ्यांची समस्या मांडण्यात आल्या होत्या. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरवर भगवे झेंडे लावून ठाकरे गटाने वातावरण निर्मिती केली होती. यावेळी ठाकरे गटाने महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला होता.



50 हजारांची भरपाई द्यावी : नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी अवकाळीने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. ती भरपाई अद्याप मिळाली नसताना पुन्हा तसेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले. यंदा तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आलीय. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी, चारा उपलब्ध करावा, पीक विम्यातील जाचक अटी निकष रद्द करावेत, सरसकट पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत : पीक विमा कंपनीला ऑनलाईन अथवा फोनद्वारे 72 तासांच्या आत नुकसानीबाबत कळवण्याची अट आहे. परंतु, या कंपनीचे संकेतस्थळ बंद आहे. संपर्कासाठी दिलेले दूरध्वनी क्रमांकावर संपर्क होत नाही. अशात विमा कंपन्या जाणीवपूर्वक संकेतस्थळ बंद ठेऊन विमाधारक शेतकऱ्यांना मानसिक त्रास देऊन फसवणूक करीत असल्याचा आरोप, ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलाय. सरकारने विमा कंपन्यांना ताकीद देऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई द्यावी अन्यथा मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं जाईल असं ठाकरे गटांने सांगितलं.

हेही वाचा -

  1. Hailstorm Damage Agriculture In Akola: गारपिटीने अकोला जिल्ह्यातील बाराशे हेक्टर शेतीवर परिणाम; बळीराजा चिंताग्रस्त
  2. Abdul Sattar In Beed : नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश, कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची बीड जिल्ह्यात पाहणी
  3. Vikhe Patil on Farmers : संकटाच्‍या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्‍याची शासनाची भूमिका - मंत्री विखे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details