नाशिक-नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून, त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा, आणि ही पर्यटन स्थळे लवकरात लवकर पर्यटकांना उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. त्या सोमवारी नाशिकमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होत्या.
नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा विकास करावा - आदिती तटकरे - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज
नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून, त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा, आणि ही पर्यटन स्थळे लवकरात लवकर पर्यटकांना उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
पर्यटन स्थळांचा तातडीने विकास करावा
शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सुविधा पुरवण्याचे नियोजन करावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासांचा पर्यटक अधिकाधिक लाभ घेऊ शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र, यासोबतच नंदूरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटन स्थळांचा विकास करावा, विकासासाठी प्राप्त झालेल्या निधिचे योग्य नियोजन करावे. कुठलेही काम अपूर्ण ठेवू नये, अशा सूचना यावेळी आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून, गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच तटकरे या बोट पर्यटनाचा देखील आनंद घेतला.