महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tomato prices News: किलोभर टोमॅटोने गाठला चिकनचा दर, गृहिणींचे कोसळले बजेट

किलोभर टोमॅटोने गाठला चिकनचा दर गाठला आहे. आलं, टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मे महिन्यात तीन रुपये किलोने मिळणारा टोमॅटोचे दर आता किरकोळ बाजारात तब्बल 150 रुपये किलो झाल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण वाढला आहे. चिकनचा दर प्रति किलो 160 रुपये किलो आहे.

Vegetable Rates Hike
भाजीपाल्याचे दर वाढले

By

Published : Jul 7, 2023, 1:44 PM IST

Updated : Jul 7, 2023, 2:11 PM IST

भाजीपाल्याचे दर वाढले

नाशिक : जिल्ह्यातून दिल्ली, बडोदा, मुंबई, सुरत या शहरांमध्ये टोमॅटो पाठवला जातो. परंतु, सध्या टोमॅटोची आवक घटली आहे. रोज केवळ 1 हजार 20 क्विंटल टोमॅटो बाजार समितीत येत आहे. एप्रिल मे महिन्यात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव पडल्यानंतर अक्षरशः शेतकऱ्यांनी टोमॅटो व रस्त्यावर फेकून दिले होते. त्यामुळे नव्याने पेरणीवर परिणामी झाला होता. आता मात्र टोमॅटोची आवक घटली आहे. मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत.

नव्याने टोमॅटो बाजारात :नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. टोमॅटो बाजारात विक्रीला येण्यासाठी अद्याप महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत टोमॅटोचे दर हे तेजितच राहणार असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. तेच शेतकरी कर्जबाजारी झाला, आता दरवाढीमुळे काही मोजक्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळेल, मात्र त्यासाठी ग्राहकांनी तो खरेदी करणे गरजेचे आहे असे टोमॅटो उत्पादक संतोष गायखे यांनी सांगितले.


बजेट कोलमडले :गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. कोथिंबीर शंभर रुपये जोडी तर टोमॅटो देखील 130 ते 150 रुपये किलोने खरेदी करावे लागत आहे. इतर भाजीपाला देखील 50 टक्क्यांनी वाढला. आम्ही आठवड्याला भाजीपाला खरेदी करतो, आता प्रत्येक वेळेस तीनशे रुपये जादा मोजावे लागत आहे. त्यामुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडले असल्याचे एका गृहिणींने सांगितले. टोमॅटोचा दर 130 ते 150 रुपये प्रति किलो असा आहे. किरकोळ बाजार टोमॅटो विक्रीला ठेवला तर ग्राहक तो खरेदी करत नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, असे एकदा असे एका भाजीपाला विक्रेत्याने सांगितले.


आजचे भाजीपाला दर :आले 120 रुपये किलो, टोमॅटो 130 ते 150 रुपये किलो, कोथिंबीर जुडी 80 ते 100 रुपये, हिरवी मिरची 100 ते 120 रुपये किलो, शिमला 80 ते 100 रुपये किलो, काकडी 60 ते 80 रुपये किलो, भेंडी 70 ते 80 रुपये किलो, गाजर 70 ते 80 रुपये किलो, भोपळा 20 ते 30 रुपये नग, फ्लावर 20 ते 30 रुपये नग, कोबी 20 ते 30 रुपये नग, गवार 100 ते 120 किलो, पालक जुडी 25 ते 30 रुपये, कोथिंबीर जुडी 80 ते 90 रुपये, कांदापात जुडी 30 ते 40 रुपये, वांगी 70 ते 80 रुपये किलो आहेत. आले देखील 320 रुपये किलोने विकले जात आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाला दुप्पटीने महाग झाला आहे. पुढील काही दिवस भाव असेच राहतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. रोजच्या जेवणात भाजी काय करावी? असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा :

  1. Tomato Price Hike : टोमॅटो खातोय 'भाव'; दराने शंभरी केली पार
  2. Tomato Price : टोमॅटोचे दर ऐकून बसेल धक्का, सर्वसामान्यांचा खिसा होतोय रिकामा
  3. Tomato Price : टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, मिळतो 3 रुपये प्रति किलो दर, तर बाजारात 15 रूपये किलो
Last Updated : Jul 7, 2023, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details