महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कष्टकरी, शेतकरी यांच्या मुळावर उठलेले सरकार पाडा- शरद पवार - Sharad Pawar criticized BJP Manmad news

आमच्या काळात आम्ही कांद्याला चांगला भाव दिला आणि शुन्य निर्यात करून शेतकऱ्यांना न्याय दिला. मात्र हे करंटे सरकार नालायक असून त्यांना जनतेने सत्तेतून खाली ओढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मनमाड येथील प्रचार सभेत दिली.

शरद पवार

By

Published : Oct 17, 2019, 7:57 PM IST

नाशिक- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आणि महाराष्ट्राच्या शौर्याची गौरव गाथा गाणाऱ्या गड किल्ल्यांना भाडोत्री देऊन या ठिकाणी डान्स बार आणि छमछम सुरू करण्याचा सरकारचा डाव आहे. अशा सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमदेवार आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे प्रचार सभेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

प्रचार सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

यावेळी पवार यांनी भाजापवर सडकून टीका करत अमित शाह आणि मोदी यांना लक्ष केले. आमच्या काळात आम्ही कांद्याला चांगला भाव दिला आणि शुन्य निर्यात करून शेतकऱ्यांना न्याय दिला. मात्र हे करंटे सरकार नालायक असून त्यांना जनतेने खाली ओढले पाहिजे. तसेच अनेक ठिकाणी भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई न करता सूड बुद्धीने ईडी मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, अशा ईडीला मी फुकट भीक घालत नाही. जोपर्यंत हे सरकार घालवणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे पवार यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

हेही वाचा-'फडणवीसांना तेल लावून आखाड्यात उतरवले तर कसा दिसेल पैलवान याचा विचारच नको'

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी आमदार संजय पवार, जयंत जाधव, शिरीष कोतवाल यांची भाषणे झाली. या निवडणुकीत भाजापा शिवसेनेला त्यांची जागा दाखवा. जनतेच्या कामाला येणारे चांगले उमेदवार निवडून द्या, असेही पवार यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जागृत राहण्याचे आवाहन केले.

हेही वाचा-सत्ता पुन्हा महायुतीचीच येणार, भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार - किरीट सोमय्या

ABOUT THE AUTHOR

...view details