नाशिक -सध्या पारंपरिक शेती करताना लागणार खर्च, मिळणारे उत्पादन आणि मिळणारा बाजारभाव हे समीकरण अनेकदा तोट्यात चालले आहे. त्यात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव ( Farmer Sakhahari Jadhav of Krishnanagar ) यांनी पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीतून ( Organic farming ) आधुनिक रेशीम शेती ( Silk farming Nashik ) साकारली आहे. यातून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रुपये मिळत असून ते शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. कृषी विभागाने ( Agriculture Department ) देखील त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदर्श कृषी पुरस्काराने सन्मानित केल आहे.
प्रयोगशील शेती :ड्रीपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग जाधव यांनी केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे. साधारण तीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जात आहे. तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते 600 रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. दरमहिन्याला साधारण 1 लाख 80 हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे.