नाशिक- सटाणा-ताहराबाद रस्त्यावरील वनोली गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाता तीन जण जागीच ठार झाले. मृतांमधील दोघे ताहराबाद येथील तर एक जण साक्री येथील रहिवासी आहे. हे तिघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक होते.
नाशिकच्या सटाण्यात अपघातात तीन युवक ठार - सटाणा-ताहराबाद अपघात
सटाणा-ताहराबाद रस्त्यावरील वनोली गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाता तीन जण जागीच ठार झाले. मृतांमधील दोघे ताहराबाद येथील तर एक जण साक्री येथील रहिवासी आहे.
![नाशिकच्या सटाण्यात अपघातात तीन युवक ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5142135-910-5142135-1574407384762.jpg)
ताहराबाद येथील ललित अनिल नंदन(२३), प्रतीक रवींद्र घरटे(१८) व यांचा मित्र धनंजय दिलीप सोनवणे(२२) हे तिघे दुचाकी क्र. एम. एच.४१ ए एक्स ०६७३ ने सटाण्याहून ताहराबादकडे जात असताना वनोली गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात धनंजय व प्रतीक यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर ललीतचा पाय तुटल्याने व डोक्यास जबर मार लागल्याने त्यास तातडीने मालेगाव येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.