महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रशासनानेच उघडकीस आणला जिल्हा परिषद नोकरी घोटाळा; ३ संशयित अटकेत - nashik crime news

या प्रकरणी लेखा व वित्त विभागातील एका कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून तसा प्रस्ताव लेखा वित्त विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे दिला आहे.

Zilla Parishad
Zilla Parishad

By

Published : Dec 16, 2020, 3:02 PM IST

नाशिक -जिल्हा परिषद आरोग्य विभागातील नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे थेट कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लेखा व वित्त विभागातील एका कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून तसा प्रस्ताव लेखा वित्त विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे दिला आहे.

अधिकृत भरती नसतानाही...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची भरती निघालेली नसतानादेखील काही कर्मचारी बनावट नियुक्तीपत्र लोकायुक्त यांचे पत्र आणि ओळख पत्र देऊन बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचा प्रकार खुद्द जिल्हा परिषद प्रशासनाने उघडकीस आणला आहे. शिक्षित बेरोजगारांना जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देण्यासाठी लेखा आणि वित्त विभागातील कनिष्ठ सहायक कर्मचाऱ्याने बनावट नियुक्ती पत्र जिल्हा परिषद ओळखपत्र राजमुद्रा यांचा व तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर नरेश गीते आणि भुवनेश्वरी एस यांच्या बनावट स्वाक्षऱ्यादेखील या बनावट नोकरी प्रकरणात वापरण्यात आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा परिदेने भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी उमेश बबन उदावंत इतर दोघा जणांना अटक केली असून यात आणखी किती लोक सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

निलंबनाची कारवाई

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लेखा व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे बनावट ओळखपत्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी आणि बनावट राजमुद्रा यांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वापर करून अनेक सुशिक्षित तरुणांची अशाप्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने जिल्हा परिषदेतील कागदपत्रांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाल आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांमध्ये कडक आचारसंहिता आणि नियमावली लागू करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details