महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Accident News: बिबट्याच्या हल्ल्याच्या तपासणी करायला जाणाऱ्या वनविभागाच्या वाहनाचा भीषण अपघात; तीन गंभीर जखमी - ट्रक चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात

नाशिकमध्ये वनविभागाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Accident News
वनविभागाच्या वाहनाला भीषण अपघात

By

Published : Mar 16, 2023, 11:21 AM IST

नाशिक :नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणवाडे येथे घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या नयना कोरडे या तीन वर्षाच्या बालिकावर बिबट्याने हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. 15 तारखेला रात्री नऊ वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे ब्राह्मणवाडे येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.


वाहनाला ट्रकची जोरदार धडक :मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणवाडे येथे घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या नयना कोरडे या तीन वर्षाच्या बालकेला शेतातून आलेल्या बिबट्यांना हल्ला करत ओढून नेले. घरच्यांनी शोध घेतला असता काही अंतरावर तिचा मृतदेह त्यांना मिळून आला. मानेला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकहून वन विभागाचे पेट्रोलिंग करणारे पथक ब्राह्मणवाडी येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला.

वाहतूक नियमांची पायमल्ली :या अपघातात वन विभागाचे तीन कर्मचारी यात वाहन चालक शरद अस्वले, वनक्षेत्रपाल फटांगरे, वनरक्षक चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्र्यंबक रस्त्यावर सातपूरकडून विरुद्ध बाजूने नाशिककडे येणाऱ्या ट्रक चालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाला. वाहतूक नियमांची पायमल्ली करून वनविभागाच्या पेट्रोलिंग कारला या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.


ट्रकविरुद्ध दिशेने आला :ब्राह्मणवाडी येथे बिबट्याने एका मुलीवर हल्ला करून तिला ठार केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळेस तात्काळ आमचे पेट्रोलिंग करणारे पथक हे घटनास्थळी जाण्यास निघाले, अशात सातपूर जवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने खताने भरलेला ट्रक नाशिककडे येत होता. या ट्रकच्या हेड लाईट्स देखील बंद होत्या. अचानक रस्त्याच्या मधोमध ट्रक आल्याने वन विभागाचे वाहन थेट त्या गाडीवर जाऊन आदळले, यामध्ये आमचे तीन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वन अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.

हेही वाचा : Madhepura Road Accident : भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details