माहिती देताना पोलीस आयुक्त नाशिक :सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील फळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील तीन पुरुषांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. वडिलांसह दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन खोलींमध्ये गळफास घेत जीवन संपले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलांसह दोन्ही मुलांची आत्महत्या :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवाशी आहे. दहा वर्षांपूर्वी ते व्यवसाय निमित्ताने नाशिकच्या सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात राहिला आले होते. कुटुंबतील वडील दीपक शिरोडे ( वय 55) हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळविक्रीचा व्यवसाय करत असत. तर, त्यांचे मुले प्रसाद शिरोडे (वय 25) राकेशे शिरोडे (वय 23) हे चारचाकी वाहनांवर फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. आज दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या, ही संधी साधून वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या केली.
वडिलासह दोन मुलांनी घेतला गळफास :त्यांनी घरातील तीन वेगवेगळ्या खोलींमध्ये पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपवले. थोड्या वेळाने आई घरी आली असता कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीची विनंती केली. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. तेव्हा वडिलासह दोन मुलांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. पतीसह दोन्ही मुलांनी गळफास घेतल्याचे दिसल्या पत्नीने एकच आक्रोश केला.
सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या :एकच घरातली तीन लोकांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. तसेच त्यांच्या घरातून एक रजिस्टर मिळून आले आहे. त्यात नोट सापडली आहे. त्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे, या सावकारांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिरोडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. त्यामुळे हे कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून नैराश्यात होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे.
हेही वाचा -Thane Crime : मित्रासोबत एकांतात वेळ घालवायला गेली अन् दोघांनी केला बलात्कार, 24 तासात आरोपी अटकेत