महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात दोन दिवसात तीन विनयभंगाचे प्रकार; महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर - नाशिकमध्ये महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

शहरामध्ये धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली. दोन दिवसांत तीन ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्याने शहर हादरून गेले आहे. एका घटनेत तर अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

आरोपी अनिल पवार

By

Published : Aug 31, 2019, 11:25 AM IST

नाशिक - शहरामध्ये धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली. दोन दिवसांत तीन ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्याने शहर हादरून गेले आहे. एका घटनेत तर अल्पवयीन आरोपी मुलांचा समावेश आहे.

नाशकात दोन दिवसात तीन विनयभंगाचे प्रकार; महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

हेही वाचा - अहमदनगर : वडनेर बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिला ठार

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे वसंतराव नाईक विद्यालयाच्या महिला स्वच्छतागृहात अनिल पवार या सुरक्षा रक्षकाने महिला शिक्षकेचा विनयभंग केला आहे. याशियाय मोबाईलमध्ये चोरून महिला शिक्षकांचे फोटो काढत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पीडित महिला शिक्षीका रडत-रडत स्वच्छता गृहाबाहेर आल्या. विद्यार्थ्यांनी मात्र या आरोपी सुरक्षा रक्षकाला पळून जात असताना पकडून बेदम चोप दिल्याचे सागितले.

हेही वाचा - पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून; स्वतःही घेतला गळफास, 'हे' आहे कारण

या घटनेने विद्यालयीन वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पीडित शिक्षिका घाबरल्याने तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, विद्यालयाच्या प्राचार्यांनी याबाबत तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, ही घटना घडण्याअगोदर गुरुवारी शहरात आणखी दोन प्रकार घडले. स्कूलव्हॅन चालकाने विद्यार्थिनीचा चालत्या व्हॅनमध्ये विनयभंग केला आहे. त्यावरून पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय उपनगर पोलीस हद्दीत दोन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीच्या डोक्याला बंदूक लावत लग्नाची गळ घातली तिने विरोध केल्याने तिची छेड काढली. यातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - बॉलीवूडमध्ये काम करु इच्छिणाऱ्या मॉडेलने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या

पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले म्हणाल्या, शहरातील या घटना जितक्या धक्कादायक आहेत तितक्याच संतापजनक देखील आहेत. अल्पवयीन मुलांचाही विनयभंगासारख्या घटनेत समावेश असल्याने आणि त्यात मुलांकडे बंदूक असल्याने मंथन करण्यास भाग पडणारी घटना आहे. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या याशिवाय अशा काही घटना समोर येत असतील तर पोलिसांशी तात्काळ संपर्क करा, असे अवाहनही त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details